सुनील पाल यांनी सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडीला म्हटले ‘स्वस्त आणि अश्लील’ कॉमेडियन

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सुनील ग्रोव्हरच्या विनोद आणि क्रॉस ड्रेसिंगवर टीका आहे. आणि त्याच्या कॉमेडीला 'स्वस्त आणि अश्लील' म्हणाले आहे.

    ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ने नेटफ्लिक्सवर पहिल्या एपिसोडपासून लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 30 मार्च 2024 रोजी या शोचा प्रीमियर झाला आणि तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेला शो आहे. तसेच आता हा शो टीव्ही चॅनेलवर नाही तर OTT प्लॅटफॉर्म ‘Netflix’ वर दाखवला जातो आणि तो 190 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे.

    भारतीय कॉमेडी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव असलेले सुनील पाल यांनी अलीकडेच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आणि विशेषत: सुनील ग्रोव्हरच्या वर्तनावर आणि त्याच्या विनोदी शैलीवर टीका केली आहे. तो म्हणाला की सुनील ग्रोव्हर तीच जुनी कॉमेडी करतो आहे. तो पडद्यावर नवीनपणा आणत नाही, जो कंटाळवाणा आणि निराश करणारा आहे. ग्रोव्हर प्रत्येक पुरुष पाहुण्यांच्या मांडीवर जाऊन बसतो अशी टीका सुनील पाल यांनी केली.

    पुढे म्हणाले, “सुनील ग्रोव्हर खूप म्हातारा दिसतो. तीच गोष्ट, माणसाला आधीच क्लीककेड झालेली गोष्ट… पाहून माणूस हसू शकत नाही. एखाद्या अभिनेत्याच्या मांडीवर जाऊन तो पुन्हा पुन्हा मुलगी असल्याचा आव आणतो हे किती किळसवाणे आहे! मग तो मुलींच्या नावाने कपडे घालून अश्लील बोलू लागतो आणि नंतर वारंवार अवॉर्ड फंक्शनला जाऊन म्हणतो, ‘आज मला कळलं की संत्रीही खाता येतात.’ सुनील ग्रोव्हर, त्याने आता आपले ज्ञान लोकांसोबत न पाजळता जेवढे चांगली कॉमेडी करता येईल तेवढे करावे.”

    सुनील पाल हे शोमधील सुनील ग्रोव्हरचे क्रॉस ड्रेसिंगला ‘स्वस्त दिसत आहे’ असे सुद्धा म्हणाले आहे. याशिवाय त्यांनी कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि इतरांचा महिलांचा पेहराव यावरही टीका केली आहे. इतकेच नाही तर त्याने आपल्या कामगिरीचे ऊर्जेशिवाय वर्णन केले आणि त्याच्या विनोदांना ‘स्वस्त’ म्हटले आहे. सुनील पाल पुढे म्हणाले, “मनुष्य एका महिलेच्या गेटअपमध्ये ‘डाफली वाफली’ म्हणत येत आहे. संवाद किती असभ्य आणि ऊर्जा सुद्धा त्याच्या अभिनयात दिसत नाही आहे. जणूकाही परवाची बिर्याणी दिली जाते आणि कामात स्वस्तता दिसत आहे. महिलांचा आदर अश्या प्रकारे केला जातो का? स्त्री भूमिका साकारताना आदराने आणि वैवस्थित साकार करा असे त्याचे म्हणणे होते.