अथिया शेट्टी-के एल राहुलचा विवाह सोहळा संपन्न, सुनील शेट्टीने वाटली मिठाई

अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत (K L Rahul) आता विवाहबंधनात अडकली आहे.लग्न झाल्यानंतर सुनील शेट्टीने (Sunil Shetty) बंगल्याबाहेर येत मीडियाला फोटोसाठी पोज दिली आणि लग्न झालं हे सांगत मिठाईदेखील वाटली.

  बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आज भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत (K L Rahul) आता विवाहबंधनात अडकली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. (K L Rahul And Athiya Shetty Wedding) अथियाचे वडील सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यामध्ये हे लग्न झालं आहे. लग्न झाल्यानंतर सुनील शेट्टीने बंगल्याबाहेर येत मीडियाला फोटोसाठी पोज दिली आणि लग्न झालं हे सांगत मिठाईदेखील वाटली. सुनील शेट्टीसोबत यावेळी त्याचा मुलगा अहानदेखील होता. सुनील शेट्टी शर्ट आणि लुंगी या दाक्षिणात्य पारंपरिक पेहरावात दिसून आला. अहान पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शोभून दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ETimes (@etimes)

  मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसहा नंतर राहुल आणि अथियादेखील बंगल्याबाहेर येत मीडियाशी संवाद साधणार आहेत. या विवाह सोहळ्याबाबत खूप गोपनीयता पाळण्यात आली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यामध्ये लग्नाचे प्रोग्राम्स 21 जानेवारीपासून सुरु झाले होते. या दिवशी कॉकटेल पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीने लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर रविवारी 22 जानेवारीला मेहंदी आणि हळदी समारंभ झाला आहे. हळदी आणि मेहंदी समारंभालादेखील मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर आज 23 जानेवारीला मुख्य विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

  के एल राहुल आणि अथिया शेट्टी हे गेल्या तीन -चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ते गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याची अफवा आधी पसरली होती.