Sunny Deop fitness (7)

सनीने बँक ऑफ बडोदाकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेला ‘सनी व्हिला’ नावाचा आपला व्हिला गहाण ठेवला. त्याऐवजी त्यांना जवळपास 56 कोटी रुपये बँकेत भरायचे होते, जे अद्याप भरलेले नाहीत.

    सनी देओलचा (sunny deol) चित्रपट गदर 2 बॉक्स (gadar 2 ) ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या यशादरम्यान रविवारी सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव (Auction) होणार असल्याची बातमी आली. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. बँक ऑफ बडोदाने ई-लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. याचे तांत्रिक कारण देण्यात आले आहे.गदर 2 स्टार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव होणार नाही आहे, बँकेने लिलावाची नोटीस मागे घेतली आहे.

    काय प्रकरण आहे?

    बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात दिली होती. सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेला ‘सनी व्हिला’ नावाचा आपला व्हिला गहाण ठेवला. त्याऐवजी त्यांना जवळपास 56 कोटी रुपये बँकेत भरायचे होते, जे अद्याप भरलेले नाहीत. हे कर्ज आणि त्यावर आकारले जाणारे व्याज वसूल करण्यासाठी बँकेने त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. जाहिरातीनुसार, सनी व्हिलाचा लिलाव 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. लिलावासाठी बँकेने मालमत्तेची किंमत 51.43 कोटी ठेवली आहे.त्याच्या टीमने रविवारी लिलावाच्या नोटिसीच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम योग्य नसल्याचे त्यांच्या बाजूने सांगण्यात आले. सनी देओल 1-2 दिवसांत संपूर्ण रक्कम देईल, असेही सांगण्यात आले.

    बॉलिवूडच्या टॉप लीगमध्ये गदर 2’ चा समावेश

    ‘गदर 2’ ने अवघ्या 8 दिवसात बॉलिवूडच्या टॉप लीगमध्ये प्रवेश केला आहे. इंडस्ट्रीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर आला आहे. ‘गदर 2’ने रणवीर सिंग-दीपिका पदुकोणचा ‘पद्मावत’ आणि सलमान खानचा ‘सुलतान’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.