madhuri and sunny leone

‘मेरा पिया घर आया 2.0’ या प्रसिद्ध गाण्यात अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सनी तिच्या चाहत्यांना मोहित करणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे.

    अभिनेत्री सनी लिओनीच्या बाबतीत एक नवी बातमी समोर आली आहे. (Sunny Leone) तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या रसिकांना एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे.

    महत्त्वाची बाब म्हणजे माधुरी दीक्षितने एकेकाळी सादर केलेला प्रसिद्ध डान्स नंबरवर सनी लिओनी थिरकणार आहे. माधुरी दिक्षितच्या ‘मेरा पिया घर आया’ गाण्याच्या नव्या व्हर्जनचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणं 8 ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. हे गाणं 1995 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘याराना’मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं.

    माधुरी आणि सनी या दोघींच्याही चाहत्यांसाठी हा नॉस्टॅल्जिया ठरणार आहे.‘मेरा पिया घर आया 2.0’ या प्रसिद्ध गाण्यात अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सनी तिच्या चाहत्यांना मोहित करणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे. या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.