sunny leone

‘ग्लॅम फेम’ या ग्राउंडब्रेकिंग शोमध्ये अभिनेता नील नितीन मुकेश आणि ईशा गुप्ता यांच्यासमवेत सनी लिओनी जजिंग पॅनेलचा भाग असेल.

  अभिनेत्री सनी लिओनी(Sunny Leone) आता नव्या जबाबदारीसाठी सज्ज झाली आहे. देशभरातील मॉडेल्सना प्रेरणा देणारा आगामी रिॲलिटी शो ‘ग्लॅम फेम’ (Glam Fame) मध्ये सनी लिओनी परीक्षक म्हणून काम करणार आहे. हा एक अनोखा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उद्देश भारतातील नव्या मॉडेल्सच्या स्वप्नांना दिशा देण्याचा आहे. (New Reality Show)

  व्हॉटवर प्रॉडक्शन आणि कृष्णा कुंज प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेला ‘ग्लॅम फेम’ शो लवकरच जिओ सिनेमावर (Jio Cinema) प्रदर्शित होणार आहे. हा शो महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना तज्ञांकडून शिकण्याची आणि स्वतःचे मार्ग तयार करण्याची संधी देऊन मॉडेलिंग उद्योगात बदल घडवून आणेल.

  सनी लिओनी या शोविषयी म्हणते की. “मॉडेलना प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शो मधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची वेगळी जबाबदारी माझ्यावर आहे. यासाठी मी उत्सुक आहे. माझा विश्वास आहे की मॉडेल्स सध्याचा ट्रेंड समजून घेतील. हे व्यासपीठ प्रतिभावान तरुण पिढीला स्फूर्ती देणारं आहे ”.

  शोमध्ये कुणाचा सहभाग ?
  या ग्राउंडब्रेकिंग शोमध्ये अभिनेता नील नितीन मुकेश आणि ईशा गुप्ता यांच्यासमवेत सनी लिओनी जजिंग पॅनेलचा भाग असेल. ‘ग्लॅम फेम’ स्पर्धकांना स्वत:चा विकास आणि आत्मपरिक्षण करण्याची संधी देणारं व्यासपीठ आहे. रोहित खंडेलवाल, संतोषी शेट्टी, दिनेश शेट्टी आणि प्रसिद्ध फॅशन आणि लाइफस्टाइल फोटोग्राफर डब्बू रतनानी यांसारखे मार्गदर्शक या शोचा भाग बनणार आहेत.

  सनी लिओनीच्या इतर प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर अनुराग कश्यपच्या निओ-नॉयर थ्रिलर अशा ‘केनेडी’मध्ये तिचा सहभाग आहे. तसेच राहुल भट्ट, जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुनसह ती तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. ‘कोटेशन गँग’ असं या प्रोजेक्टचं नाव आहे.