sushant and kunal jani

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कुणाल जानी (Kunal Jani Arrested By NCB)) याला अटक केली आहे. ही अटक बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs connection) प्रकरणात करण्यात आली आहे.

    मुंबई : वांद्रे येथील हॉटेलचा संचालक कुणाल जानी ( NCB Arrested Kunal Jani) याला एनसीबीने अटक केली आहे. कुणाल जानी हा दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र होता. एनसीबीचे(NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी कुणाल जानी याला अटक केली आहे. ही अटक बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs Case) प्रकरणात करण्यात आली आहे.सुशांतच्या मृत्युनंतर कुणाल फरार होता. अखेर त्याला बुधवारी खार भागातून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे.

    अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी तपासणी करताना बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यावेळी वांद्रे येथील रेस्टॉरंटचे संचालक कुणाल जानी याचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. माध्यमांच्या अहवालानुसार कुणाल जानी हा त्या व्हॉट्स ॲप ग्रुपचा एक भाग होता, ज्यात रिया चक्रवर्ती देखील सहभागी होती. ईडीला रियाच्या फोनवर सापडलेल्या चॅटमध्ये कुणाल सहभागी होता. या चॅटमध्ये दोघेही चरस आणि डूबीज या ड्रग्जबद्दल बोलत आहेत. या ग्रुपमध्ये रिया आणि सॅम्युअल ड्रग्जबद्दल बोलताना आढळले. यावेळी ईडीनेही कुणालची ६ तास चौकशी केली होती. मात्र यानंतर तो फरार झाला होता. आता त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.