रिया चक्रवर्तीच्या कमबॅकवर पुन्हा वाद, सुशांतच्या बहिणीने केला संताप व्यक्त

रिया चक्रवर्ती अभिनेत्रीपेक्षा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळेच चर्चेत जास्त आहे. रिया चक्रवर्तीने कमबॅक केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. रियाचा व्हिडिओ पाहून सुशांतच्या बहिणीने संताप व्यक्त केला आहे.

  Sushant Singh : अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakrawarthy) तिच्या कामापेक्षा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळं नेहमी चर्चेत असते. रिया चक्रवर्तीने कमबॅक केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. एमटीव्ही रोडीजच्या 19 व्या सीजनमधून ती कमबॅक करणार आहे. तिनं नुकताच या शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पुन्हा रिया चक्रवर्ती हे नाव चर्चेत आलं आहे. रियाचा हा व्हिडिओ पाहून सुशांतच्या बहिणीने संताप व्यक्त केला आहे.

  सुशांत सिंगने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी रिया चक्रवर्ती सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुशांतला जाऊन तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री रोडीजमधून कमबॅक करत आहे. तिनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

  प्रियांकाची पोस्ट काय आहे?

  प्रियांकाची सिंहनं ट्वीटरवर रिया चक्रवर्तीचा अपमान करत खूप काही लिहिलं आहे. प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “तू काय घाबरणार..? तू तर.. कोणीतरी सत्ताधारीच तुला ही हिम्मत देऊ शकतो. सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात निर्णय देण्यास वेळ का होत आहे यासाठी कोण जबाबदार आहे हे यावरून स्पष्ट होत आहे..” अशी सणसणीत पोस्ट प्रियांकाने केलेली आहे. सध्या प्रियांकाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.


  रिया चक्रवर्तीची पोस्ट काय आहे?

  रियाने स्वत:च्या कमबॅकबद्दल सांगताना लिहिले आहे की, “एमटीव्हीच्या रोडीजमधून मला कमबॅक करण्याची संधी मिळत आहे. मी खूप उत्सुक आहे. एमटीव्हीसोबत काम करणं म्हणजे घरात काम करण्यासारखं आहे. एका अर्थाने मी घरवापसी केलेली आहे. त्याप्रमाणे तिनं पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘अजूनही माझा द्वेष, तिरस्कार करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, मी पुन्हा येते आहे.तुम्हाला काय वाटले मी पुन्हा येणार नाही का, पण तसे होणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मला कुणाला घाबरावे असे वाटत नाही. अशा शब्दांत रियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या तिच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.