‘तेव्हापासून धनंजय माने इथेच राहतात…’ ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला ३३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वप्नील जोशीची खास पोस्ट

अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही ३३ वर्षांनंतरही(33 Years Of Ashi Hi Banwa Banwi) प्रत्येक पिढी हा चित्रपट तितक्याच आवडीने बघते आणि लोटपोट होऊन हसते.अभिनेता स्वप्नील जोशीने(Swapnil Joshi Social Media Post About Ashi Hi Banwa Banwi) आज चित्रपटाने ३३ वर्षे पूर्ण केल्याच्या आनंदात एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banwa banawi) या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल ३३ वर्षे (33 Years Complete) पूर्ण झाली. दिनांक २३ सप्टेंबर १९८८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने इतिहास घडवला आहे. आजही हा चित्रपट लोकप्रिय आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने(Swapnil Joshi Post About Ashi Hi Banwa Banwi) या चित्रपटाला ३३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

  अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही ३३ वर्षांनंतरही प्रत्येक पिढी हा चित्रपट तितक्याच आवडीने बघते आणि लोटपोट होऊन हसते. अभिनेता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुशांत रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा या सगळ्या कलाकारांनी उत्कृष्ट काम करत हा चित्रपट लोकप्रिय केला.

  अभिनेता स्वप्नील जोशीने आज चित्रपटाने ३३ वर्षे पूर्ण केल्याच्या आनंदात एक खास पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये स्वप्नील जोशीने लिहिलं आहे की, “अशी ही बनवाबनवी ! माझ्यासाठी, सर्वोत्तम मराठी सिनेमांपैकी एक ! आज release होऊन ३३ वर्ष झाली ना!!? वाटतच नाही ! कधीही पहा, कुठूनही पहा, कितीही वेळा पहा, निखळ मनोरंजन, केवळ अद्भुत कलाकृती !!! Btw, तेव्हा पासून धनंजय माने सदैव इथेच (आमच्या हृदयात) राहतात !! सचिनजी, अशोकमामा, लक्ष्यामामा, सुप्रियाताई, निवेदिताताई, प्रियाताई, अश्विनीजी, अरुणजी, वसंतजी, किरण शांतारामजी, सुशांतजी, सुधीरकाका व संपूर्ण टीमला सलाम !!”