लग्नाच्या तीन महिन्यांतच स्वरा भास्कर गरोदर, नवऱ्यासोबत शेयर केला गोड फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. स्वत: स्वराने तिच्या इंस्टाग्रामवर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करून लोकांना माहिती दिली आहे.

  बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन स्वरा भास्करने (Swara Bhaskar Pregnant) तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी स्वराने सपा नेते फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन महिन्यानंतर स्वराच्या घरात नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी तिने दिली आहे. स्वराने बेबी बंप फ्लॅान्ट करत नवऱ्यासोबतचा एक फोटो शेयर केला आहे.

  फोटो शेयर करत दिली माहिती

  स्वराने नवऱ्यासोबतचा एक फोट शेयर केल आहे. या फोटोत ती घराच्या छतावर नवऱ्यासोबत बसल्याचं दिसून येतय. यावेळी तिने बेबी बंप फ्लॅान्ट करत साजेसं कॅप्शन दिलं आहे. ‘कधीकधी तुम्हाला तुमच्या सर्व प्रार्थनांचे उत्तर एकाच वेळी मिळते. मी स्वतःला कृतज्ञ आणि धन्य समजतो. मी उत्साही आहे, आमच्या नवीन जगात नवे पाऊस येणार आहे. ‘#comingsoon #Family #Newarrival #gratitude #OctoberBaby.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

  चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

  स्वराच्या या पोस्टवर चाहत्यांसहीत सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत. निर्माते गुनीत मोंगा यांनी लिहिले, खूप प्रेम. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. लहानाचे अभिनंदन. प्रिया मलिकने लिहिले- अभिनंदन. अभिनेत्री तिलोत्तमा लिहितात, अरे खूप अभिनंदन. तर, रसिका दुग्गल, सहीत गौहर खान यांनीही स्वराच अंभिनंदन केलंय. 

  काही दिवसांपूर्वी  पसरली होती ही अफवा

  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्वरा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. लग्नानंतर काही महिन्यांनीच ती आई झाल्याचेही काहींनी सांगितले. यासाठी यूजर्सने अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल केले होते. मात्र, नंतर ही चर्चा खोटी ठरवण्यात आली. 

  कोण आहे स्वरा भास्करचा नवरा फहाद? 

  फहाद अहमद हा विद्यार्थी नेता आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्टुडंट युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. फहादने जुलै 2022 मध्ये अबू असीम आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घेतले. फहाद हे महाराष्ट्र आणि मुंबई युनिटमध्ये युवाजन सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त आहेत.