swara bhaskar

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. स्वरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे व्हिडिओ,ट्विट्स आणि फोटोंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. आता स्वरा पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

या व्हिडीओमध्ये स्वरा चक्क वाईनमध्ये बिस्किट बुडवून खाताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. वाईनसोबत बिस्किट खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे पाहा, अशा प्रकारे बिस्किट वाईनमध्ये बुडवा आणि विरघळण्याच्या आत खाऊन टाका. अशा आशयाचं वक्तव्य करत स्वराने बिस्किट खाण्याची ही अनोखी कल्पना चाहत्यांना सुचवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

मात्र ही कल्पना काही नेटकऱ्यांना आवडली नाही. त्यांनी स्वराला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. तुझा मेंदू गुडघ्यात आहे का?, आम्ही तर चहासोबत बिस्किट खातो, ताई तुला वेड लागलं आहे का? अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही ट्रोलर्सनं या व्हिडीओची जोरदार खिल्ली उडवली आहे. चाहत्यांनी स्वराला पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरूवात केलीये.