swarajya saudamini tararani

ताराराणींची(History Of Tararani) गाथा सोनी मराठी (Sony Marathi New Serial)वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (Swarajya Saudamini Tararani)या मालिकेतून १५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

    मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असं जिचं वर्णन केलं गेलं आहे, अशा ताराराणींची(History Of Tararani) गाथा सोनी मराठी (Sony Marathi New Serial)वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (Swarajya Saudamini Tararani)या मालिकेतून १५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

    ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे दोन शूर सेनानी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली. एक वाघ, तर दुसरा सिंह. मराठ्यांना धुळीस मिळवायचं, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा, या ईर्षेनं आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमानं दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.

    अभिनेते यतीन कार्येकर या मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत. व्यक्तिरेखेचा प्रचंड अभ्यास करणारा कार्येकरांसारखा सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे. इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडं पाहून होतो.