aai kuthe kay karte

अरुंधती आशुतोषला काय उत्तर देणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte) मालिका या वळणावर असतानाच आता आशुतोषची मैत्रीण अनुष्काची एन्ट्री होणार आहे.

  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अनेकांची आवडती मालिका आहे. अरुंधतीसह मालिकेतील इतर पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  अनिरुद्ध देशमुखपासून विभक्त झाल्यानंतर अरुंधतीला आशुतोषमुळे नवी उमेद मिळाली होती. आशुतोषने अरुंधतीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. अरुंधती याचं उत्तर आशुतोषला त्याच्या वाढदिवशी देणार होती. अरुंधती आशुतोषला काय उत्तर देणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. मालिका या वळणावर असतानाच आता आशुतोषची मैत्रीण अनुष्काची एन्ट्री होणार आहे.

  आशुतोषची मैत्रीण आल्याने अरुंधतीला तिच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा लागणार आहे.अनुष्का आशुतोषची जुनी मैत्रीण आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते दोघे भेटणार आहेत. मालिकेत आशुतोषची मैत्रीण अनुष्काची भूमिका अभिनेत्री स्वरांगी मराठे साकारणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर असताना आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिका अधिक रंजक होणार आहे. अनुष्काच्या येण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्याचं काय होणार हा प्रश्न आता समोर उभाराहिला आहे.