Tamannaah

महादेव ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग ॲप्लिकेशनच्या जाहिरातीसंदर्भात तिला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे.

  सध्या बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया  (Tamannaah Bhatia)तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे कमी तर अभिनेता विजय वर्मासोबत नाव जोडल्याने जास्त चर्चेत असते. आता पुन्हा तिचं नाव चर्चेत आलं आहे. याच कारण मात्र वेगळं आहे. फेअरप्ले ॲपवर IPL 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी प्रसिद्ध  तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.  महादेव गेमिंग आणि बेटिंग ॲप प्रकरणशी याचा संबध असून तमन्नााल 29 एप्रिल रोजी सायबर सेलसमोर हजर राहण्यासं  सांगण्यात आलं आहे.

  यापुर्वी अनेक सेलेब्रिटींची झालिये चौकशी

  याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटिया, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. याप्रकरणी गायक बादशाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांचीही चौकशी करण्यात आली  आहे. 23 एप्रिल रोजी संजय दत्तला बोलावण्यात आले होते. परंतु, त्याने आपले म्हणणे नोंदवण्यासाठी तारीख व वेळ मागितली असतानाही तो हजर झाला नाही. आपण भारतात नसल्याचेही त्याने सांगितले.

  नेमकं प्रकरण काय

  मिळालेल्या माहितीनुसार, फेअरप्लेने IPL 2023 चे स्क्रिनिंग बेकायदेशीरपणे केले होते, अशी तक्रार आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. वायाकॉमनं याविरोधात तक्रार केली होती.  फेअरप्लेने आयपिएलचं बेकादेशीर स्क्रिनिंग केल्यामुळे वायाकॉमनं त्यांच  नुकसान झाल्याचा दावा केला. त्यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने फेअरप्ले ॲपविरोधात एफआयआर दाखल केला होता. याचे प्रमोशन अनेक सेलेब्रिटींनी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. त्यामुळए तिला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आलं आहे. फेअरप्लेच्या प्रमोशनसाठी तिच्याशी कोणी संपर्क केला होता. त्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले? या संदर्भात तिची चौकशी केली जाणार आहे.

  29 एप्रिल रोजी होणार हजर

  तमन्ना भाटियाला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहावे लागणार आहे. तमन्ना भाटिया केवळ 34 वर्षांची आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. तमन्ना भाटियाने 2005 मध्ये चांद सा रोशन चेहरा या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकापेक्षा एक सरस अभिनय केला आहे