sahana

अभिनेत्री सहानाचा मृत्यू झाला आहे. ( Actress Sahana Death)  केरळमधल्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यातील परम्बिल बाजार याठिकाणी राहत्या घरी १३ मे रोजी तिचा मृतदेह आढळला.

    तमिळ (Tamil) आणि मल्याळम (Malyalam) चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सहानाचा मृत्यू झाला आहे. ( Actress Sahana Death)  केरळमधल्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यातील परम्बिल बाजार याठिकाणी राहत्या घरी १३ मे रोजी तिचा मृतदेह आढळला. खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत सहानाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून सहानाचा पती सज्जाद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    सहानाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला आहे. सहानाचा १२ मे रोजी वाढदिवस होता. त्याच दिवशी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “माझी मुलगी आत्महत्या (Suicide) करूच शकत नाही. तिची हत्या झाली आहे. तिचा पती तिला मारहाण करत असल्याची तक्रार ती माझ्याकडे नेहमी करायची. तिचा खूप छळ केला गेलाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा”, अशी मागणी सहानाच्या आईने केली.