
राज ही मालिका सोडण्याचा विचार करत आहे. याविषयी त्याचे निर्मात्यांसोबत बोलणे देखील झाले आहे. परंतु..
“तारक मेहता का उल्टा चश्मा” (Tarak Meheta Ka Ulta Chashma) हा शो टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय असा शो आहे. या शो मधील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे दिवसेंदिवस या ‘शो’चे चाहते वाढतच जात आहे. त्याचप्रमाणे या मधील कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. परंतु सध्या या शो मधील बरेचसे कलाकार हा शो सोडून जाताना दिसत आहेत. सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरूचरण सिंह यांनी हा शो सोडल्यावर आता टप्पुची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट हासुद्धा मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज ही मालिका सोडण्याचा विचार करत आहे. याविषयी त्याचे निर्मात्यांसोबत बोलणे देखील झाले आहे. परंतु या गोष्टींचा अजूनपर्यंत काहीच निष्कर्ष लागला नाही. राज अनादकट याचा प्रोडक्शन हाऊस सोबत असलेला करार हा रिन्यू करायचा होता. तर प्रोडक्शन हाऊसने तो न वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणून आता राजने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमसआधीच राज आपले शूटिंग पूर्ण करेल, असे म्हटले जात आहे.