अभिनेता टारझनसह कुटुंबातील पाच सदस्यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू, पोलीस चौकशी सुरू

सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

    प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जो लारा याचं विमान अपघातात निधन झालं आहे. ते ५८  वर्षांचे होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचंही निधन झालं आहे. जो आपल्या कुटुंबीयांसोबत एका प्रायव्हेट विमानानं प्रवास करत होते.

    विमानात काही तांत्रिक बिघाड झाला अन् नॅशविलेमधील टेनेसी नदीत त्याचं विमान कोसळलं. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमानाचा पार चक्काचूर झाला आहे. मात्र अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही.