एका टॅक्सी चालकाने बनवलाय मराठी चित्रपट, ‘बबली’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पॅशन मुव्हीज प्रस्तुत ‘बबली’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोबर्ट मेघा यांनी ‘बबली’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

    मनात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असली तर माणूस काहीही साध्य करू शकतो. याचीच प्रचिती सतीश समुद्रे यांच्या माध्यमातून येतेय. डोळ्यात चित्रपट क्षेत्रात येण्याचे स्वप्न पण हातात असलेली कुटुंबाची जबाबदारी यामुळे गाडीवर ड्रायव्हर म्हणून सतीश यांना काम करावे लागलं. मात्र हा सर्व खडतर प्रवास पूर्ण करून सतीश समुद्रे  एक  बनले आहेत. निर्माते सतीश सामुद्रे (Satish Samudre) यांचा ‘बबली’(Babli Movie) चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. टॅक्सी ड्रायव्हरचं काम करणारे सतीश सामुद्रे या चित्रपटाचे निर्माते व लेखक आहेत.(Marathi Movie Made By Taxi Driver)

    पॅशन मुव्हीज प्रस्तुत ‘बबली’ हा सिनेमा 23 जूनला प्रदर्शित होणार आहे. रोबर्ट मेघा यांनी ‘बबली’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. ‘बबली’ चित्रपट हा प्रसिद्ध हिंदी सिनेमा ‘बंटी और बबली’ शी मिळताजुळता नाहीये, हे आधीच स्पष्ट करण्यात आलंय. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ या टॅगलाईननं चित्रपटाच्या कथानकाची कल्पना येते. सिनेमा जसाजसा पुढे सरकेल तसतशी वेगवेगळ्या वळणावर सिनेमा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल, असं दिग्दर्शक रोबर्ट मेघा यांनी सांगितलं आहे.

    चित्रपट मूळ प्रेम कथेवर आधारित आहे. कॉलेजमधलं प्रेम पुढे टिकतं का? बबलीला तिचं प्रेम मिळतं का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी चित्रपट पाहावा लागेल. सिनेमाची गाणी प्रदर्शित झाल्यापासून तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत.गगन गजरलवार, मानसी सुभाष, विवान वैद्य, अनिरुद्ध चौथमोल ही चित्रपटाची स्टार कास्ट. ‘बबली’ चित्रपटाला प्रकाश प्रभाकर यांनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर, मोहम्मद इरफान आणि वैशाली माडे, सरोदी बोरा आणि प्रकाश प्रभाकर यांनी चित्रपटाची गाणी गायलीत. चेतन रघू चौधरी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
    प्रदीप कुमार वर्मा यांनी सहदिग्दर्शन, शिवा राव यांनी छायांकनाची जबाबदारी पेलली आहे. सिद्धेश प्रभू यांनी सिनेमाचं संकलन केलंय. ‘बबली’ या मराठी सिनेमाचे कार्यकारी निर्माता योगेश डगवार आहेत. नृत्यदिग्दर्शक मयूर अहिरराव यांनी काम पाहिले आहे. तर चित्रपटाचे एडिटर सिद्धेश प्रभू आहेत.