
कंगना राणौतचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत. आता तिने थोडा ब्रेक घेऊन तेजस हा चित्रपट आणला आहे, ज्याच्या प्रमोशनवर तिने खूप मेहनत घेतली आहे.
कंगना राणौतचा (kangana Ranaut) ‘तेजस’ (Tejas) हा चित्रपट शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. जबरदस्त अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला पण पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याच्यावरीव खर्च पाहता फारशी कमाई करू शकला नाही आहे. सर्वेश मेवारा दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट जवळपास 45 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन त्या दृष्टीने काही विशेष राहिलेले नाही.
तेजसच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन किती?
कंगना राणौत, वरुण मित्रा आणि अनुज खुराना यांसारख्या स्टार्सचा हा चित्रपट भारतातील पहिला एअर अॅक्शन चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. एवढी तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘तेजस’चे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये आहे. ऑनलाईन बुकिंगच्या बाबतीत चित्रपटाला फारशी प्रगती झाली नाही, त्यामुळे चित्रपटाला सुरुवातीच्या दिवशी फारसा चांगला व्यवसाय मिळणार नसल्याचा अंदाज बांधला जात होता.
तेजसच्या कमाईचा आलेख वाढणार?
कंगना रणौतच्या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 6.7 रेटिंग मिळाले आहे, जे फारसे वाईट नाही, परंतु अंतिम निर्णय प्रेक्षकांच घेणार आहे.चित्रपटाच्या बजेटनुसार पहिल्या दिवसाची कमाई फारशी चांगली म्हणता येणार नाही. समीक्षकांनाही हा चित्रपट फारसा आवडला नाही. मात्र, लोकांना हा चित्रपट आवडला तर आगामी काळात चित्रपटाच्या कमाईचा आलेख उंचावण्याची शक्यता आहे. समीक्षकांनी खराब रेटिंग देऊनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. पण कंगना राणौतचा ‘तेजस’ हे करू शकेल का? हे येणाऱ्या काळातच कळेल.