टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांच निधन, 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

अभिनेते ऋतुराज सिंह यांच कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

    मुंबई: दोन तीन दिवसापुर्वी दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं (Suhani Bhatnagar) वयाच्या अवघ्या 19 वर्षी निधन झालं. या बातमीनं सिनेसृष्टीला धक्का बसला होता. इतक्या कमी वयात अभिनेत्रीचं जाणं सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारं होतं. आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालिका सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांच आज निधन (Ruturaj Singh Passes Away) झालं. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्नास घेतला. कार्डियाक अरेस्टने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

    टिव्ही जगतात नावाजलेलं नाव

    ऋतुराज सिंह यांचा जन्म 23 मे 1964 रोजी राजस्थानमध्ये कोटा इथं सिसोदिया राजपूत कुटूंबात झाला. त्यांच शालेय शिक्षण दिल्लीत पार पडलं. त्यानंतर ते 1993 मध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमे, मालिका केल्या. होगी अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, आहट आणि अदालत, दीया और बाती हम अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका साकारली. तसेच,  राजनीती, बद्रीनाथ की दुल्हनिया अशा बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

    ऋतुराज सिंह सध्या अनुपमा या मालिकेत काम करत होते. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीनं कलाकारांनाही धक्का बसला आहे. टीव्हीसृष्टीत शोककळा पसरली आहे. सहाय्यक भूमिकेतून ऋतुराज यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.