कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही, अभिनेता किरण माने वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसची उडी

किरण माने यांनी यापुढे स्वतःला एकटे समजू नये, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असेही बाबासाहेब पाटील म्हणाले. किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने सन्मानाने परत मालिकेत घ्यावे अन्यथा 'मुलगी झाली हो' या मालिकेचे पुढील भाग चित्रित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

   

  मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढल्याचं प्रकरण आता चांगलाच गाजत आहे. सोशल मिडीयावर अनेक जण किरण मानेला समर्थन करत असताना दिसत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसची उडी घेतली आहे. या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मांडत किरण मानेंच समर्थन केलं आहे.

  किरण माने यांनी यापुढे स्वतःला एकटे समजू नये, त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असेही बाबासाहेब पाटील म्हणाले. किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने सन्मानाने परत मालिकेत घ्यावे अन्यथा ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे पुढील भाग चित्रित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

  स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अभिनेता किरण माने यांना काढल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. राजकीय भूमिका घेतल्याने विलास पाटालाची भूमिका साकराताना प्रेक्षकांनी पाहीलं आहे. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. त्यांच्या गावरान बाज त्यांच्या लेखणीत दिसतो. कधी शाहरुख खानच्या समर्थनात पोस्ट तर कधी राजकीय पोस्टमुळे किरण माने सतत चर्चेत असतात. या पोस्टमुळे त्यांच्यावर टीका देखील होते. मात्र आता खरं तरी त्यांना राजकीय भूमिका घेणं नडलं आहे. त्यांना थेट मुलगी झाली हो ( kiran mane removed from mulgi zali ho ) मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समोर आलं आहे. एका मुलाखतीमध्ये किरण यांनी या बद्दल सांगितले होते. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘ काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !’ किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.

  काय म्हणाले किरण माने?
  मी कोणाचं नाव घेऊन पोस्ट केलेल्या नाहीत. महागाई, बेरोजगारी, विकास याबाबत मी ऊठवलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि त्यावर मी बोलत राहणार. ही तर झुंडशाही झाली. या झुंडशाहीला धक्का देत राहणार. माझ्या भुमिकेत फरक होणार नाही’ असंही किरण माने यांनी स्पष्ट केलं आहे.