(फोटो साभारः Instagram @rupaliganguly)
(फोटो साभारः Instagram @rupaliganguly)

'अनुपमा' (Anupamaa) मध्ये रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन (Madhavi Gogate Passed Away) झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची कोरोनाशी झुंज सुरू होती. त्यांना मुंबईतील सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुपाली गांगुली यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री नीलू कोहलीनेही एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई : ‘अनुपमा’ फेम माधवी गोगटे (Madhavi Gogate Death) यांचे रविवारी निधन झाले. त्यांनी या मालिकेत रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका साकारली होती. माधवी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. माधवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या त्यातून बरीही होत असल्याचे बोलले जात होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि रविवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी त्यांचे निधन झाले.

  माधवी गोगटेंची माजी सह-अभिनेत्री रुपाली गांगुली हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. रुपालीने इन्स्टा स्टोरीवर माधवी गोगटे यांचा हसतमुख फोटो शेअर केला आहे. आणि लिहिले, “बरेच काही बाकी आहे… सद्गती माधवी जी.” माधवीने यापूर्वी ‘अनुपमा’ (Anupamaa Actress Death) मध्ये रुपाली गांगुलीचे पात्र अनुपमाच्या आईची भूमिका साकारली होती. नंतर त्यांची जागा सविता प्रभुणे यांनी घेतली.

  (फोटो साभारः Instagram @rupaliganguly)

  ज्येष्ठ अभिनेत्री आणि तिची मैत्रिण नीलू कोहली यांनीही माधवीसाठी फोटोसह एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, “माझी प्रिय मैत्रिण माधवी गोगटे…नाही…माझा विश्वास नाही बसत तू आम्हाला सोडून गेलीस. मन मोडून गेलीस माधवी. तुझं जाण्याचं वय काय होतं.. तू खूप लहान होतीस.. या कोरोनाने घात केला…. P.S: तुम्ही माझ्या मेसेजला उत्तर दिले नाही तेव्हा मी फोन उचलला असता आणि तुमच्याशी बोलले असते. मी आता फक्त पश्चाताप करू शकते.”

  माधवी गोगटे (Madhavi Gogte Films) या ५८ वर्षांच्या होत्या आणि त्यांचे मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात निधन झाले. माधवीने चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. अशोक सराफ यांच्या ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांच्या लोकप्रिय नाटकांमध्ये ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणाकडे’ यांचा समावेश होता.

  माधवी गोगटे (Madhavi Gogate TV Serials)ने अलीकडेच ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतून मराठी टीव्ही शोमध्ये पदार्पण केलं होतं. माधवी यांनी ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा ना था’, ‘कहीं तो होगा’ आणि ‘अनुपमा’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये उत्कृष्ट आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.