सध्या या मालिकेचे शूटींग रत्नागिरी जिह्यातील जयगड येथे सुरु आहे. जयगड येथील प्रसिध्द अश्या जय विनायक मंदिरात ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटींग चालू आहे. याठिकाणी मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित आहेत. ओम आणि स्वीटूच्या लग्नाला विरोध करणारी मालविका देखील हजर असून तीचा देखील या लग्नाला पाठिंबा आहे हे विशेष. ओम आणि स्वीटूच लग्न होणार का? या पश्नाचे उत्तर पेक्षकांना 19 तारखेच्या महाएपीसोडमध्ये मिळणार आहे.
रत्नागिरी : छोट्या पडद्यावरच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मालिकेने फार कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत दाखवण्यात येणारी एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. स्वीटू आणि ओमचं प्रेम प्रेक्षकांना भावलं. आता हेच प्रेम लग्नात पार पडले आहे. त्यांचा हा लग्नसोहळा कोकणातील जयगड येथील जय विनायक मंदिर येथे थाटामाटात पार पडला.
सध्या या मालिकेचे शूटींग रत्नागिरी जिह्यातील जयगड येथे सुरु आहे. जयगड येथील प्रसिध्द अश्या जय विनायक मंदिरात ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटींग चालू आहे. याठिकाणी मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित आहेत. ओम आणि स्वीटूच्या लग्नाला विरोध करणारी मालविका देखील हजर असून तीचा देखील या लग्नाला पाठिंबा आहे हे विशेष. ओम आणि स्वीटूच लग्न होणार का? या पश्नाचे उत्तर पेक्षकांना 19 तारखेच्या महाएपीसोडमध्ये मिळणार आहे.
मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचं होणारं लग्न पाहून प्रेक्षक सुखावले होते. मात्र मालिकेत आलेल्या ट्विस्टने प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आणि मालिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. आता पुन्हा एकदा मालिकेत ओम आणि स्वीटू यांच्यातील अंतर कमी होताना दाखवण्यात आलं आहे. मात्र अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे पुन्हा या दोघांचे लग्न होताना प्रेक्षकांना दिसणार आहे. मालविका पुन्हा काय गोंधळ घालणार आहे की नाही हे अजूनही कलाकारांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.