धक्कादायक!  तेलुगू अभिनेत्री पवित्रा जयरामचं निधन झाल्यानंतर पती चंद्रकातनंही संपवलं आयुष्य

तेलुगू अभिनेत्री पवित्रा जयरामचं अपघाती निधन झाल्यानंतर तिच्या पतीनंही राहत्या घरी आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    काही दिवसापुर्वी तेलुगू टिव्ही इंडस्ट्रीतील आघाडाची अभिनेत्री पवित्रा जयराम (Pavithra Jayaram) हिचा रविवारी रस्ता अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील मेहबूबा नगरजवळ झालेल्या भीषण कार अपघातात तिच्या बहिणीसह आणखी दोन जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनं तेलगू सिनेविश्वाला धक्का बसला होता. आता पुन्हा एक दुखद बातमी समोर येत आहे.  अभिनेत्री पवित्राचा पती  अभिनेता चंद्रकातनही निधन झालं आहे. पत्नीच्या निधनामुळे चंद्रकांला प्रंचड मानसिक धक्का बसला होता. यातूनच त्याने दु:खी होत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता चंद्रकांत हा पत्नी पवित्रा जयरामच्या निधनानंतर प्रचंड मानसिक तणावात होता.  त्याने आपल्या पत्नीसाठी एक भावूक पोस्टही लिहिली होती. पवित्रासोबतचा फोटो पाेस्ट करत तो म्हणाला की,  ‘तुझ्यासोबतचा शेवटचा फोटो. मला एकटे सोडण्याचा विचार पचनी पडत नाही, माझी पावी आता नाही. प्लीज, परत ये.’ असं लिहीलं होतं.

    अपघातात पवित्राचा मृत्यू

    काही दिवसापुर्वी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हनाकेरे येथून परतत असताना अभिनेत्री पवित्राचा अपघात झाला. पावित्रा बसून असलेल्या कारचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजकावर आदळली. त्यानंतर हैदराबादहून वानापर्थीकडे येणाऱ्या बसने उजव्या बाजूने तिच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या बहिणीसह आणखी दोघंजण गंभीर जखम झाले.