कंगना राणावतच्या बहुप्रतिक्षित ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित, जयललितांचा थक्क करणारा प्रवास पडद्यावर!

हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काल कंगनाने या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

  सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावतचा आज वाढदिवस, तिच्या वाढदिवसाचं निमित्तसाधत तिचा आगामी ‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  काय आहे ट्रेलरमध्ये

  या ट्रेलरमध्ये एका अभिनेत्रीपासून तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर जयललिता आणि एमजीआर यांचं नातं कसं होतं हे ही या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये राजकीय जीवनात जयललिता यांना कोणत्या गोष्टींचा सामाना करावा लागला हे दाखवण्यात आले आहे. या भूमिकेसाठी कंगनाला २० किलो वजन वाढवावे लागले होते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. काल कंगनाने या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात तीचे ट्रास्फार्ममेंशन दिसले. काहींनी याचे कौतुक केलं तर काहींनी कंगनाला ट्रोलही केलं.