थलपती विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तौबा गर्दी, उत्साही फॅन्समुळे विजयच्या गाडीचं नुकसान!

फॅन्समुळे विजयच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र तो पूर्णपणे सुरक्षित आहे.

  साऊथचा सुपरस्टार थलपती विजयची ( Thalapathy Vijay ) त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्याला पाहण्यासाठी नेहमी फॅन्सची गर्दी जमते.नुकतचं विजय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळला आला. येथे चाहत्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. यावेळी विमानतळावर प्रचंड गर्दी जमली होती. जेव्हा तो हॉटेलमध्ये जाण्यासाठी कारने निघाला तेव्हा चाहत्यांची गर्दी त्याच्या मागे मागे आली आणि यादरम्यान त्याच्या कारचं नुकसान झालं. गाडीच्या काचा फुटल्या. त्याच्या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  चाहत्यांची तौबा गर्दी

  दलपती विजय त्याच्या आगामी ‘GOAT’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सोमवारी अभिनेता केरळला आला आहे. तो रुअनंतपुरमध्ये येताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी विमानतळावर जमली होती आणि तो हॉटेलकडे निघाला तेव्हा चाहत्यांची गर्दी त्याच्या गाडीच्या मागे आली.

  कारचं झालं नुकसान

  अचानक आलेल्या फॅन्सच्या गर्दीमुळे विजय ज्या कारमधून प्रवास करत होता त्या गाडीचं नुकसान झालं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कारची काच फुटल्याचे दिसत आहे. तसेच, कारवर अनेक डेंट्स दिसतात. रिपोर्ट्सनुसार,  विजय खुप दिवसांनी केरळला आला, त्यामुळे त्याला पाहताच चाहत्यांचे नियंत्रण राहीलं नाही.

  विजयला दुखापत नाही

  फॅन्समुळे विजयच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र तो पूर्णपणे सुरक्षित आहे. वृत्तानुसार, विजयने याआधी 2011 मध्ये केरळमध्ये ‘कावलन’ चित्रपटाचे शूटिंग केले होते. आगामी चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट व्यंकट प्रभू दिग्दर्शित करत आहेत.