poonam pandey

अलीकडेच पूनम पांडेने तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. आणि 24 तासातच त्याने सर्वांसमोर येऊन सत्य सांगितले. त्याच्या या कृतीने सर्वांनाच धक्का बसला. या संपूर्ण नाट्यात ज्या एजन्सीचा हात होता त्यांनी आता माफी मागितली आहे.

  दोन दिवसापूर्वी मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Panday) निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीनं फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही मोठा धक्का बसला होता. त्यांनतर शनिवारी पूनमनं जीवंत असल्याचं स्वत: सांगितल. मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावर लोकांनी पूनमला चांगलच सुनावलं, पूनमसह तिच्या मृत्यूच्या नाटकात सामील असलेल्या एजन्सीवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरली लोकांचा वाढता रोष पाहून आता पूनमच्या मृत्यूच्या नाटकात तिला पाठिंबा देणाऱ्या एजन्सीनं आता माफी मागितली आहे. Schbang असं या एजन्सीचं नाव आहे. शाबांगने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक विधान जारी करून प्रत्येकाची माफी मागितली, विशेषत: ज्यांनी कर्करोगाच्या आव्हानांचा सामना केला आहे किंवा त्यांचे साक्षीदार आहेत.

  एजन्सीनं काय म्हण्टलं  ?

  शाबांगने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करून माफी मागितली आहे. त्यांनी लिहिले – “होय, Hotterfly च्या सहकार्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्याच्या पूनम पांडेच्या उपक्रमात आम्ही सहभागी होतो. तसं केल्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत, विशेषत: ज्यांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा सामना करावा लागला आहे.

  त्यांनी पुढं लिहिलं की, “आमचे कार्य एका मिशनद्वारे चालविलं गेलं होतं आणि ते गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरुकता पसरवणं होतं. 2022 मध्ये, 123,907 गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रकरणं आणि 77,348 मृत्यूची नोंद झाली. स्तनाच्या कर्करोगानंतर, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. भारतातील मध्यम वयोगट. महिलांना होणारा करणारा हा दुसरा सर्वात घातक आजार आहे.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

  पूनमवर कारवाईची मागणी

  पूनम पांडेनं केलेलं हे मृत्यूचं नाटक मात्र आता तिच्याचं अंगलट आलं आहे. तिच्या मृत्यूच्या खोट्या बातमीनं फॅन्ससह सेलेब्रिटिनींही शोक व्यक्त केला होता. त्यानंतर तिनं ती जीवंत असल्याचं सांगितल्यांतर सोशल मीडियावर लोकांनी तिला खूप सुनावलं. तिच्यावर कारवाईची सुद्धा मागणी केली. ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ (all india cine workers association) नं पूनमच्या या कृत्यावर संताप व्यक्त करत तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेच्या कृत्याबद्दल असोसिएशनने मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता पूनम अडचणीत येण्याची शक्यता आहे.