‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरू झाला वाद, दिग्दर्शकाने दिलं असं उत्तर

दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांचा 'मासूम सवाल' हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट ५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. पण, त्याआधीच चित्रपटाचे पोस्टर समोर आले. या पोस्टरवरून वाद सुरू झाला आहे.

    असे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतात, ज्यावरून वाद सुरू होतात. गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावरून वाद सुरू आहे. दरम्यान, आता दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांचा ‘मासूम सवाल’ हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट ५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. पण, त्याआधीच चित्रपटाचे पोस्टर समोर आले. या पोस्टरवरून वाद सुरू झाला आहे.

    ‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आला आहे. मात्र, या वादावर चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि अभिनेत्री एकावली खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    न्यूज एजन्सी IANS नुसार, अभिनेत्री एकावली खन्ना म्हणाली की, ‘प्रथम तिला माहिती नाही की चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद आहे. पण, मी एवढेच सांगेन की, चित्रपट निर्मात्यांना कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आजच्या पिढीत अंधश्रद्धेला थारा नाही. महिलांवर जबरदस्तीने लादल्या जाणार्‍या चुकीच्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत.