Domestic Violence : घरगुती हिंसा संबंधित लघुपट एमएमआरमधील १५० स्क्रीनवर प्रदर्शित होणार

जरी #MeraFarzHai अभियानाची सुरुवात 2020 मध्ये महिलांचे अधिकार, त्यांच्या अस्तित्वाला असणाऱ्या धोक्याच्या विरोधात झाली असली, तरीही आपल्यातल्या प्रत्येकाला आवश्यकता आणि जबाबदारीची जाणीव करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. महिलांच्या बाबतीत हिंसेच्या घटनांची नोंद करण्यासाठी पहिले पाऊल उचलण्याकरिता हे अभियान मार्गदर्शक ठरेल.

  • टाळेबंदीमुळे नातेसंबंधांत बिघाड निर्माण होऊन घरगुती हिंसाचाराच्या घटनांत होणारी वाढ चिंताजनक
  • #MeraFarzHai 2.0द्वारे लोकांना व्यक्त होण्याचे आवाहन
  • विवियाना मॉल आणि ठाणे पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून लोकांना सजग होऊन जबाबदार होण्याचे आणि 103 या हेल्पलाईनवर तक्रार करण्याचे आवाहन, या विषयावरील फिल्म 150 स्क्रीनवर प्रदर्शित होणार
  • अतिरिक्त धोरण बदल तसेच वाढीव सुरक्षेसाठी Online petition

मुंबई : महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशात अभूतपूर्व टाळेबंदीची स्थिती निर्माण झाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव लोकांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आले. अशा परिस्थितीत अनेक महिलांना घरगुती हिंसेचा सामना करावा लागला. गैरवर्तन असणाऱ्या व्यक्तींसोबत एकाच घरात त्या अडकल्याने परिस्थिती अधिकच चिघळली.

मागील वर्षात घरगुती हिंसेचा घटनेत कमालीची वाढ दिसून आली. हिंसेचा कहर सातत्याने सुरूच राहिला. कुटुंबाची इभ्रत, इज्जतीपायी तर कधी बळी पडलेल्या व्यक्तीला लाजेचे भय असल्याने अनेक प्रकरणांत तक्रार दाखल झाली नाही. घरगुती हिंसेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने तसेच अशा प्रकरणांची तक्रार करण्याच्या दृष्टीने लोकांना जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विवियाना मॉलने ठाणे पोलिसांच्या साथीने #MeraFarzHai ची दुसरी आवृत्ती लाँच केली.

जरी #MeraFarzHai अभियानाची सुरुवात 2020 मध्ये महिलांचे अधिकार, त्यांच्या अस्तित्वाला असणाऱ्या धोक्याच्या विरोधात झाली असली, तरीही आपल्यातल्या प्रत्येकाला आवश्यकता आणि जबाबदारीची जाणीव करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. महिलांच्या बाबतीत हिंसेच्या घटनांची नोंद करण्यासाठी पहिले पाऊल उचलण्याकरिता हे अभियान मार्गदर्शक ठरेल.

या अभियानाचा भाग म्हणून तसेच महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलिसांच्या सहयोगाने विवियाना मॉलने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर)तील 150 स्क्रीन्सवर लघुपट प्रदर्शित करण्याची आखणी केली. समाजात राहताना केवळ मूक राहून चालत नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी जबाबदारी घेऊन व्यक्त होण्याचे आवाहन या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात आले.

घरगुती हिंसाचाराविरुद्ध उठवलेला एक आवाज एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे बदलवू शकतो ही या व्हीडीओमागची संकल्पना आहे. त्यामुळे माघार घेऊ नका आणि अवतीभवतीच्या महिलांच्या बाबतीत गैरवर्तन आढळल्यास त्या विरुद्ध #AwaazUthao व त्यांच्याकरिता सुरक्षित वातावरण तयार करा. ही फिल्म युट्युब आणि अन्य सोशल मिडिया मंचांवर प्रदर्शित करण्यात आली आहे. जेणेकरून हा संदेश अनेकानेक योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल, अधिकाधिक लोकांना घरगुती हिंसाचाराविरुद्ध आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.

ठाणे पोलिसांसमवेतची भागीदारी जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षेसाठी 103 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याची जनजागृती करण्यात येणार आहे. जेणेकरून शक्य त्या मार्गाने व्यक्ती योग्य ती पाऊले उचलण्यासाठी सतर्क होतील.

त्याशिवाय घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या व्यक्तीचा आवाज होण्यासाठी आणि देशात सुरक्षित वातावरणाची खातरजमा रहावी या दृष्टीने विवियाना मॉलने नाटकनेक्ट फाउंडेशनच्या वतीने तातडीची गरज असणाऱ्या पीडितांना समाजाचे पाठबळ लाभावे म्हणून ऑनलाईन याचिका तयार केली आहे. ही याचिका petition महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, केंद्रीय मंत्रालय यांना संबोधून करण्यात आली आहे.

समाजात महिलांना असुरक्षिततेची भावना देणाऱ्या विघातक घटकांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना सरकारने अभय द्यावे, पीडित व्यक्ती तसेच त्यांच्या बालकांसाठी आश्रयस्थानांची निर्मिती करावी, त्याचप्रमाणे कुटुंब आणि त्यातील सदस्यांना मार्गदर्शन देणारी केंद्र उभारावी, या पद्धतीने धोरणांत बदल करण्याविषयीची शिफारस याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेला विविध कार्यकर्ते, एनजीओ आणि सेलेब्रिटीनी पाठबळ दर्शवले आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना विवियाना मॉलच्या चीफ मार्केटींग ऑफिसर रिमा किर्तीकर म्हणाल्या की, “दरम्यानच्या काळात आमचे सामाजिक उपक्रम हे महिला कल्याणावर भर देणारे राहिले. कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासासाठी महिलांच्या सबलीकरणाकरिता केंद्र आवश्यक असते ही आमची धारणा आहे.

‘ExtraordiNAARI’ या विद्यमाने काही महत्त्वाची अभियाने सुरू केली आहेत. स्टॉप ॲसिड सेल, विमेन ऑन व्हीलचेअर्स, #MeraFarzHai ही त्यापैकीच काही अभियाने असून त्यांचे कौतुक झाले. समाजातील सर्व थरांतील महिलांना एकत्र आणून त्याच्यासाठी भक्कम पाठबळ उभे करण्याचे आवाहन या माध्यमांतून करण्यात येते. भारतातील महिला मोठ्या प्रमाणावर घरगुती हिंसेला बळी पडत आहेत. त्यातच अलीकडे निर्माण झालेल्या महासाथीने परिस्थिती बिघडवून टाकल्याचे हाती लागलेल्या आकडेवारीतून सिद्ध होते. समाजाने या स्थितीवर मार्ग शोधून काढण्याची जबाबदारी घेणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित होते.

महिला हिंसेला बळी पडल्याने त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर विपरीत पडसाद उमटतात. त्यांचे मानसिक आरोग्य, समाज जीवन, आर्थिक सुरक्षा, मुलांसोबतचे नाते आणि कार्यालयीन आयुष्यावर परिणाम होतो. अनेक महिला कुटुंबाच्या दबावाखाली येऊन किंवा लाजेच्या भीतीपायी गुन्हेगारासोबत जीवन व्यतीत करण्याचा मार्ग निवडतात, स्वत:च्या जोडीदाराच्या समाजातील इज्जतीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. हे अभियान आणि ठाणे पोलिसांच्या पाठींब्याने आम्ही एका लघुपटाची निर्मिती केली असून ती १५० स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. जेणेकरून आपल्या सभोवती एखादी पीडिता दिसल्यास आंधळी भूमिका न घेता त्यांच्या मदतीला जावे, स्थिती जाणून हिंसात्मक घटनांची तक्रार १०३ क्रमांकावर करावी.

घरगुती हिंसाचाराचा विपरीत परिणाम महिलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर होत असतो. या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या घटकाला अभय राहावे या दृष्टीने तसेच बळी पडलेल्या व्यक्तीला लागलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी मार्गदर्शन मिळावे आणि स्त्रियांना तात्पुरते सुरक्षित आश्रय मिळावा यासाठी धोरणांत बदल करण्याची याचिका तयार करण्यात आली आहे. घरगुती हिंसेला बळी पडलेल्या सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे म्हणून सुरक्षेच्या उपाययोजनांची विनंती करणारी ऑनलाईन याचिका लॉन्च करण्यात आली आहे.”

विवियाना मॉलने २०१५ मध्ये ‘ExtraordiNAARI’  हे मुख्य अभियान सुरू केले. याचे उद्दिष्ट विविध महिलाभिमुख सामाजिक उपक्रम राबवणे, महिलांच्या कल्याणासाठी समाजात सजगता जागृत करून दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्याचे आहे.

विवियाना मॉलच्या वतीने २०१८ दरम्यान #STOPACIDSALE अभियान सुरू करण्यात आले. ज्या माध्यमातून भारतातील ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांची न ऐकलेली, न सांगितलेली कथा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम झाले. या संपूर्ण संकल्पनेला एक पाऊल पुढे नेत ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांना फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करण्याची संधी देण्यात आली. समाजावर ओरखडे निर्माण करणाऱ्या ॲसिडच्या विक्रीला बंदी करणाऱ्या अभियानाची सुरुवात विवियाना मॉलने केली. त्यांच्या कल्पक आणि समाज हितकारक उपक्रमांचे कायमच कौतुक होत असते. त्याप्रमाणे या अभियानाला ICSC गोल्ड एशिया पॅसीफिक शॉपिंग सेंटर अवॉर्ड 2018, त्यानंतर मे २०१९ दरम्यान लास वेगास येथे ICSC विवा बेस्ट ऑफ बेस्ट अवॉर्डने गौरविण्यात आले.

विवियाना मॉलने २०१९ दरम्यान विमेन ऑन व्हीलचेअर’च्या गौरवार्थ #RespectWomenOnWheelchair अभियानाचा आरंभ केला, त्याचेही भरपूर कौतुक झाले. हे अभियान NINA फाउंडेशनच्या साथीने करण्यात आले. दिव्यांग असूनही न हरता जिद्दीने स्वत:च्या क्षेत्रात यशस्वी ठरून आव्हानांचा कणखर सामना करणाऱ्या महिला या उपक्रमात अधोरेखित करण्यात आल्या होत्या. विवियाना मॉल ExtraordiNAARI च्या साथीने आगामी काळात समाजात बदल घडवून आणण्याचे ध्येय राखून आहे.

समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून वर्तन करण्याची शिकवण 2020 मध्ये MeraFarzHai, (माझी जबाबदारी आहे), द्वारे करून देण्याची मोहीम विवियाना मॉलने सुरू केली. लिंगभेदाचे उच्चाटन करून, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणारे हे अभियान प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी करण्यात आले. अधिकाधिक लोकापर्यंत हा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने व्हिडीओ तयार करून ते एमएमआर पट्ट्यातील १५० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले.

या अभियानाला विविध सोशल मीडिया मंचांवर १८ दशलक्षहून अधिक व्हूव्ज मिळाले. भारतासोबतच परदेशात देखील या अभियानाचे कौतुक झाले. याच धर्तीवर आधारलेली अभियाने सप्टेंबर 2020 मध्ये ओंटारियन गव्हर्नमेंट आणि ले’ओरीयल पॅरीसने राबवले. सप्टेंबर २०२० मध्ये ओंटारियन गव्हर्नमेंट #WhoWillYouHelp त्यानंतर नोव्हेंबर २०२० दरम्यान ले’ओरीयल पॅरीसने #StandUpAgainstStreetHarassment अभियाने सुरू केली. यासंबंधित कॅम्पेन फिल्म तेलंगण राज्य पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर रिपोस्ट केली.