
या चित्रपटात बोमन आणि हत्ती रघू यांच्यातील प्रेम दाखवण्यात आले आहे.
यावर्षाच्या 95 वा अकादमी पुरस्कारांची (Oscar Award 2023)घोषणा करण्यात आली आहे. या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात तेलगू चित्रपट RRR ला भारतातून नामांकन मिळाले होते, त्यासोबत दोन डॉक्युमेंटरी चित्रपटांनाही नामांकन मिळाले होते, त्यापैकी‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ने’ सर्वोत्तकृष्ट लघुपट श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. चित्रपटाचे निर्माते गुनीत मोंगा आहेत. नेमकी काय कथा आहे या चित्रपटाची जाणुन घेऊया.
‘द एलिफंट विस्परर्स’ हा नेटफ्लिक्सवरचा एक माहितीपट आहे. या माहितीपटाला ‘ऑस्कर 2023’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तामिळनाडूतील एक कुटुंब या हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं यावर बेतलेला हा माहितीपट आहे.
चित्रपटाची कथा
चित्रपटाच्या कथेची सुरुवात निसर्गरम्य दृश्यांनी होते, त्यानंतर हाती सांभाळणारा माहुत बोमन आपला हत्ती रघूला आंघोळीसाठी नदीवर घेऊन जातो. या चित्रपटात बोमन आणि हत्ती रघू यांच्यातील प्रेम दाखवण्यात आले आहे. बोमन सांगतो की रघू त्याला कसा भेटला. त्याला जंगलात रघू जखमी अवस्थेत आढळला, जिथे कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे तो जखमी झाला होता आणि तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. तर रघूच्या आईचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. रघूची त्याच्या कळपाशी ओळख करून देण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. यादरम्यान, बोमन बेली या महिलेची निवड हत्तींच्या बाळाची काळजी घेण्यासाठी करतो.बेली आणि बोमन रघूची काळजी घेतात. या लघुपटात माणुस आणि हत्तींमधील प्रेम, त्या हत्तींना सोडून दिल्यावर आणि त्यांच्या कळपापासून वेगळे झाल्यानंतर त्यांची कशी काळजी घेतली जाते हे दाखवण्यात आले आहे.
रघु आणि अम्मुमधील भावनिक बंध
हत्ती ओळखण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी गळ्यात घंटा घातली जाते. जेणेकरून ते जंगलात कुठेतरी हरवले तर सहज सापडतील. या चित्रपटात रघूचा एक मित्रही आहे, त्याचे नाव कृष्णा आहे. कृष्णा आणि रघु संपूर्ण वेळ मजा करतात आणि दोघेही एकमेकांना साथ देतात. कट्टुनायकन बोमन आणि रघू यांच्यातील एक सुंदर बंध यामध्ये दर्शविण्यात आले आहे. दरम्यान, जंगलात आग देखील लागली होती, ज्यामध्ये जवळपास सर्व हत्तींचा मृत्यू होतो आणि एक लहान हत्तीण वाचले. ज्यांना बोमन आणि बेला दत्तक घेतात आणि त्यांची काळजी घेतात. जोडप्याचा सगळा वेळ त्यांची काळजी घेण्यात जातो. रघू आणि अम्मू यांच्यातील बंधही घट्ट होत जाताच. दरम्यान, बोमन आणि बेलीचेही लग्न होते. नंतर रघूला वनविभागाच्या सोपवण्यात येतं, त्यामुळे अम्मू बराच काळ उदास राहतो. मात्र, अम्मूच्या सानिध्यात ते नंतर रमु लागतात.
प्रियांका चोप्राने कौतुक केले होते
त्याचवेळी प्रियंका चोप्रानेही यापूर्वी या चित्रपटाचे कौतुक केले होते. प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये तिने पोस्टर शेअर करत लिहिले, भावनांनी भरलेला हार्ट टचिंग डॉक्युमेंटरी, मी नुकताच पाहिला, मला खूप आवडला. ही अद्भुत कथा जिवंत केल्याबद्दल कार्ती गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचे खूप खूप आभार.