‘द फॅमिली मॅन 3’ च्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, मनोज बाजपेयीने सुरू केली वेबसिरीजची शूटींग

मनोज बाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन 3' या वेबसिरीजबाबत एक मोठे अपडेट आले आहे. या बहुप्रतिक्षित वेबसिरिजच्या तिसऱ्या सिझनच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे.

  अभिनेता मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) बहुप्रतिक्षित वेबसिरीज द फॅमिलीच्या (The Family Man 3) तिसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. पहिल्या दोन सिझनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर तिसऱ्या सिझन बनवण्याचीही मागणी होऊ लागली होती. आता या वेबसिरिजबाबत मोठं अपडेट समोर आलं असून याबद्दल ऐकून चाहत्यांचा आंनद गगनात मावेनासा होणार आहे. काय आहे याबद्दलच अपडेट जाणून घ्या.

  द फॅमिली मॅन ही अभिनेता मनोज बाजपेयीची ओटीटी पदार्पणातील पहिली वेबसिरीज आहे. पहिल्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी भरुभरुन प्रेम दिलं. त्यातील श्रीकांत तिवारी ही व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पंसतीस उतरली. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री समंथा आणि मनोज वाजपेयीच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिकलं.  दुसरा सिझनदेखील सुपरहिट झाला होता. यानंतर आता चाहते आता तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चाहत्यांच्या प्रतिक्षेला थोडा दिलासा देत निर्मात्यांनी मालिकेच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाल्याचं सांगितलं आहे. OTT प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओने मनोज बाजपेयी सोबत टीम फोटो शेअर करून The Family Man 3 बद्दल हे अपडेट शेअर केलं आहे.

  सोशल मीडियावर पोस्ट शेअर

  द फॅमिली मॅन 3 च्या शूटिंगची घोषणा करताना प्राइम व्हिडिओने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या चित्रात द फॅमिली मॅन 3 चा टाळ्या वाजवणारा बोर्ड दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये, मनोज बाजपेयी, सुमन कुमार आणि राज आणि डीके यांची जोडी ‘द फॅमिली मॅन सीझन 3’ शूट सुरू करताना दिसत आहे, मनोज बाजपेयी श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत परत येणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by prime video IN (@primevideoin)

  चाहत्यांचा उत्साह शिगेला

  प्राईम व्हिडिओच्या या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स कमेन्ट्स अक्षरश पाऊस पडला आहे. चाहत्यांसहीत सेलेब्रिटीही विविध कमेंट्स करून आपला आंनद व्यक्त करत आहेत. अनेक जण हार्ट इमोजी पोस्ट करुन मेकर्सना धन्यावाद देत आहेत तर अनेक जण श्रीकांत तिवारीला पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं म्हणत आहेत.