द कश्मीर फाइल्स, RRR मागे टाकत गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ नं ऑस्करसाठी मारली बाजी

अनेक दिवसांपासून एसएस राजमौलींच्या RRR, विवेक अग्नीहोत्रींच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्वांना मागे टाकत गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ने बाजी मारली आहे.

    ऑस्कर पुरस्कार (Oscar Award)म्हणटलं की डोळयासमोर येतात जगभराले सर्वोत्कष्ट चित्रपट आणि पुरस्कार मिळवण्यासाठी अनेक चित्रपट शर्यतीत असतात. (Oscar 2023 Entry)नेहमी प्रमाणे यंदाही ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकनांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी अनेक चित्रपट शर्यतीत असताना गुजराती चित्रपट‘छेल्लो शो’  (Chhello Show) ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी निवडण्यात आला आहे.

    ऑस्कर पुरस्कार नामाकंन होणार म्हण्टलं की अनेकांना उत्सकता होती की यावर्षी कोणता चित्रपट भारताकडून ऑस्करवारी पाठवण्यात येईल. अनेक दिवसांपासून एसएस राजमौलींच्या RRR, विवेक अग्नीहोत्रींच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं नाव चर्चेत होतं.  मात्र या सर्वांना मागे टाकत गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ने बाजी मारली आहे. पॅन नलिन  दिग्दर्शित या चित्रपटात एका ग्रामीण भागातील नऊ वर्षाच्या मुलाची कथा  दखवण्यात आली आहे.  या मुलांच चित्रपटावर अफाट प्रेम असतं. या चित्रपटात भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल यांच्या मुख्य भूमीका आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात आला.