
तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाला (tunisha sharma suicide case) जवळपास वर्ष होत आलं आहे. अद्यापही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. आता तुनिषा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता शिझान खानच्या (Sheezan Khan) ला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. आता त्यामुळे याप्रकरणी आता शिझानसमोर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अखेरचा पर्याय शिल्लक आहे.
काय आहे प्रकरण?
अली बाबा – दास्तान-ए-काबुल’ मालिकेची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी वसईतील शुटींग सेटवर आत्महत्या केली होती. या प्रकरणी सहकलाकार शिझान खानला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती. यापुर्वीही शिझाननं गुन्हा रद्द करून जामीनाची मागणी करत हायकोर्टात याचिका केली होती. आता पुन्हा त्याच्यावर दाखल असलेला दाखल करण्यास मुंबई उच्चन्यायालयानं नकार दिला आहे. अभिनेता शिझान विरोधात तुनिषाच्या आईनं तक्रार दिली होती. आईच्या तक्रारी नंतर याप्रकरणी शिझान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शुटींग सुरु असताना दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
तुनिषाचे शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध
तुनिषा शर्मासोबत काम करणाऱ्या शिझान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिनं हे आत्महत्येच पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.