सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेल्या घराला नवीन भाडेकरू मिळेना!

क या फ्लॅटमध्ये रहायला घाबरत आहेत. याच फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्याचं लोकांना कळतं तेव्हा ते फ्लॅट पाहायला देखील येत नाहीत. तसेच कोणी हा फ्लॅट विकत घ्यायला तयार नाहीत.

  मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत अजूनही अनेक तर्कवितर्क काढले जातात. सुशांत सिंहच निधन झालं तेव्हा तो वांद्रे येथील एका आलिशान फ्लॅट मध्ये भाड्याने राहात होता. मात्र सुशांतने या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याला अडीच वर्ष उलटूनही या फ्लॅटला नवीन भाडेकरू न मिळाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

  ब्रोकरने या फ्लॅटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”हा सी-फेसिंग फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहे. या फ्लॅटची किंमत दरमहा पाच लाख रुपये आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला अडीच वर्ष होऊनही हा फ्लॅट रिकामाच आहे. कोणीही या घरात राहायला तयार नाही”.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rafique Merchant (@rafiquemerchant)

  एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ब्रोकर रफिफ मर्चंट म्हणाले,”लोक या फ्लॅटमध्ये रहायला घाबरत आहेत. याच फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्याचं लोकांना कळतं तेव्हा ते फ्लॅट पाहायला देखील येत नाहीत. तसेच कोणी हा फ्लॅट विकत घ्यायला तयार नाही”. रफिफ मर्चंट पुढे म्हणाले,”फ्लॅटच्या मालकाला आता हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही”. अशाप्रकारे सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्या फ्लॅटसाठी भाडेकरू मिळत नाही आहेत. लवकरच हा फ्लॅट विकला जावा अशी मालकांची इच्छा आहे.

  सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मित मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आजही सुशांतच्या आठवणीत त्याचे चाहते भावूक होतात. आज तो या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात मात्र जिवंत आहे.