‘द जर्नी ऑफ इंडिया’; ला आवाज महानायकाचा

भारत, यू.एस., यू.के. आणि फिलीपिन्समध्ये स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्कवरी + वर जागतिक स्तरावर सहा भागांच्या मालिकेचा प्रीमियर. ही विशेष मालिका डिस्कव्हरी नेटवर्क चॅनेलवर भारत, जपान, सिंगापूर, फ्रान्स, स्वित्झर्लंड, युएई, इजिप्त, ब्राझील, इराण आणि केनियासह 140 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित केली जाईल.

    देशातील समृद्ध वारसा, नवकल्पना आणि समकालीन चमत्कार ज्यांनी नवीन मालिकेसह या देशाच्या अत्याधुनिक प्रगतीचा मार्ग मोकळा केला आहे त्याचे स्मरण करण्यासाठी एक विशेष मालिका -जर्नी ऑफ इंडियाचा घेवून येत आहेत. या मालिकेचा प्रीमियर भारतात 10 ऑक्टोबर रोजी होत आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन जे अतुल्य भारताचा चेहरा देखील आहे यांनी या मालिकेचे कथन केले आहे. ही मालिका अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे आणि नेत्यांच्या योगदानासह भारताच्या वारशाची कथा उत्तमपैकी विणते.

    विषयांच्या विस्तृत श्रेणीमध्ये पसरलेली, ही विशेष मालिका गेल्या 75 वर्षांतील राष्ट्राची प्रगती, प्रभाव आणि उपलब्धी यांचे सखोल दर्शन देते; विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती आणि आमच्या महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी अंतराळ मोहिमेपासून सिनेमाच्या जगापर्यंतचा प्रवास केवळ मनोरंजनच नाही तर प्रेरणाही देतो. देशाच्या काना कोपर्‍यामध्ये आढळणाऱ्या विश्वासाच्या आकर्षक कथांपासून ते जगभर प्रिय असलेल्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीपर्यंत – गेल्या 75 वर्षांत भारताने हळूहळू परंतु स्थिरपणे जागतिक मंचावर आपली उपस्थिती दर्शविली आहे. ऐतिहासिक फुटेजच्या विस्तृत संग्रहाचे वैशिष्ट्य असलेली या मालिकेत आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि विषय तज्ञांचे मत देखील ऐकायला मिळतील.

    अर्जुन नोहवार, जनरल मॅनेजर- दक्षिण आशिया, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, ही स्मरणीय नवीन मालिका वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीची प्रेरणादायी कथा जिवंत करण्यासाठी वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. राष्ट्राच्या लोकभावना, तिची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि तिथल्या लोकांच्या भावनेचा वेध घेणार्‍या भारताच्या जोशपूर्ण प्रवासात प्रेक्षकांना घेऊन जाण्यासाठी महानयक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना आम्हाला अभिमान वाटतो.” मालिकेबद्दल अधिक तपशील येत्या आठवड्यात जाहीर केले जातील.

    द जर्नी ऑफ इंडियाचा प्रीमियर भारतात डिस्कव्हरी चॅनल, टीएलसी, डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो आणि डीतामिल वर 10 ऑक्टोबर रोजी होईल.