anupam kher the kashmir files

सोशल मीडियावर ‘द काश्मिर फाइल्स’चं मोशन पोस्टर शेअर करताना अनुपम खेर Anupam Kher Shared Motion Poster Of The Kashmir Files)  यांनी म्हटलंय की, “हा सिनेमा आणि त्यातला माझा परफॉर्मन्स मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही, तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे, जे ३० हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल २६ जानेवारीला.”

    आपल्या आजवरच्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारणारे अनुपम खेर नेहमीच कोणत्या ना कोणत्या चांगल्या कारणामुळं चर्चेत असतात. खलनायकापासून चरित्र अभिनेत्यापर्यंत सर्वच भूमिकांना न्याय देणाऱ्या अनुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेलं ‘ द काश्मिर फाइल्स’ (The Kashmir Files) या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर (Motion Poster Release OF The Kashmir Files) सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.

    अनुपम यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या आपल्या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री यांची ‘द ताश्कंद फाइल्स’ फिल्म चर्चेत होती आणि या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवली आहे.

    सोशल मीडियावर ‘द काश्मिर फाइल्स’चं मोशन पोस्टर शेअर करताना अनुपम खेर Anupam Kher Shared Motion Poster Of The Kashmir Files) यांनी म्हटलंय की, “हा सिनेमा आणि त्यातला माझा परफॉर्मन्स मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही, तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे, जे ३० हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल २६ जानेवारीला.”

    या सिनेमात अनुपम यांनी पुष्करनाथ पंडित नावाचं कॅरेक्टर साकारलं आहे. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. १९ जानेवारी १९९०च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावं लागतं. पुढे जे काय होतं ते सिनेमात पाहायला मिळेल.