Kashmir Files

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files)या चित्रपटाद्वारे विवेक रंजन अग्निहोत्री यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच(The Kashmir Files To Release On Republic Day) २६ जानेवारीला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

    ‘द ताश्कंद फाईल्स’(The Tashkent Files) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा आणि संवादलेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरण्यात यशस्वी झालेल्या लेखक-दिग्दर्शक-निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आणखी एक फाईल खोलल्याचं सर्वांनाच माहित आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files)या चित्रपटाद्वारे विवेक रंजन अग्निहोत्री यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच(The Kashmir Files To Release On Republic Day) २६ जानेवारीला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

    ‘द काश्मीर फाईल्स’चं लेखन-दिग्दर्शनही विवेक यांनीच केलं आहे. यात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार आणि चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका आहेत. झी स्टुडिओज, तेज नारायण अगरवाल, अभिषेक अगरवाल, पल्लवी जोशी आणि विवेक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

    या चित्रपटाची कथा काश्मीरी पंडीतांच्या निर्गमनावर आधारीत आहे. या चित्रपटासाठी विवेक यांनी काश्मीरी पंडीतांविषयी सखोल अभ्यास केला असून, खूप रिसर्चही केल्याचं समजतं. ‘राईट टू जस्टिस’ ही चित्रपटाच्या टायटलसोबत देण्यात आलेली टॅगलाईन या चित्रपटात न्याय-हक्कासाठीचा लढा पहायला मिळणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे.