‘या’ दिवशी उलगडणार शकुंतला आणि दुष्यंतची प्रेमकथा, ‘शाकुंतलम’ चित्रपटाची रिलीज डेट आली समोर

हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. समंथा प्रभू या चित्रपटात शकुंतलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता  देव मोहन राजा दुष्यंतची भूमिका साकारताना दिसणार आहे

  दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha) सध्या तिच्या अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या अभिनेत्रीचा एक चित्रपट ‘शाकुंतलम’ (Shaakuntalam) रिलीज होण्यास सज्ज आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 4 नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचं   पहिलं मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे.

  चित्रपटाबद्दल माहिती देताना अभिनेत्री समंथा प्रभूने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने चित्रपटांच मोशन पोस्टर शेयर केलं आहे. हे पोस्टरने प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Gunaa Teamworks (@gunaa_teamworks)

  महान कवी कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ या संस्कृत नाटकावर आधारित या चित्रपटात शकुंतला आणि दुष्यंताच्या प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.  हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. समंथा प्रभू या चित्रपटात शकुंतलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता  देव मोहन राजा दुष्यंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा बाल राजकुमार भरतच्या भूमिकेत दिसणार आहे.