नवदाम्पत्याने धरला चक्क गोंडी नृत्याच्या तालावर ठेका!

सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीच्या आदिवासी नृत्याची समाज माध्यमावर धूम पाहावयास मिळत आहे. नृत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    वर्धा : आज काल अनेक जण लग्नही हटके करण्याचा प्रयत्न करतात. आदिवासी लोककलेची परंपरा जपत तसेच समाजात पारंपरिक नृत्याची संस्कृती रुजविण्यासाठी काही जण प्रयत्न करतात. अन वर्धा जिल्ह्यातील तालुक्यातील पिपंळखुटा आयोजित लग्न सोहळयात नवदाम्पत्याने चक्क गोंडी नृत्याच्या तालावर ठेका धरला. लोककलेच्या गोंडी नृत्यावर राहूल-अबोली या नवदाम्पत्याने तुफान डान्स केला. कलाकारांसह सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदही द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. सध्या सोशल मीडियावर नवरा-नवरीच्या आदिवासी नृत्याची समाज माध्यमावर धूम पाहावयास मिळत आहे. नृत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.