The person named 'A' in Deepika's chat belongs to Arjun Rampal? NCB officials say

अर्जुनच्या घरातून एनसीबीला ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्याही सापडल्या होत्या. या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडत असल्याने या औषधावर भारतात बंदी आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणचे ड्रग्ज चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने तिची चौकशी केली होती. दीपिकाच्या चॅटमध्ये ए नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. ए अर्जुन रामपाल असू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता. ती व्यक्ती अर्जुनच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर एनसीबीने अर्जुनला समन्स बजावत त्याची चौकशी केली होती. आतापर्यंत दोनदा त्याची चौकशी झाली आहे.

त्याला एनसीबीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोनदा झालेल्या चौकशीमध्ये अर्जुन रामपालच्या जबाबात फरक आढळून आला आहे. आम्ही त्याचा तपास करत आहोत. गरज पडल्यास आम्ही त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवू शकतो असे सांगीतले.

९ नोव्हेंबर रोजी एनसीबीने अर्जुनच्या घरावर धाड टाकली. अर्जुनची लिव्ह इन पार्टनर ग्रॅब्रिएला डेमेट्रियड्सची चौकशी झाली होती. याशिवाय अर्जुनच्या कार चालकालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीने अर्जुनच्या घरातून काही मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त केले होते.
पहल्यांदा म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी तब्बल सात तास अर्जुनची चौकशी झाली होती.

मात्र, यावेळी त्यानी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे त्याला दुस-यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. अर्जुनच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसचे रिपोर्ट आल्यानंतर एनसीबीने त्याला दुस-यांदा समन्स बजावले होते. या रिपोर्टमधून काही महत्त्वाचे पुरावे एनसीबीच्या हाती लागल्याचे समजते.