अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटातील ‘धागों से बांधा’ हे गाणं रिलीज

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटातील 'धागों से बांधा' हे गाणं

    बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटातील ‘धागों से बांधा’ हे आणखी एक नवीन गाणं आज म्हणजेच २८ जुलै रोजी झी म्युझिक कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे. या व्हिडीओ गाण्यात अभिनेत्याचे आपल्या बहिणींवरचे प्रेम पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता आपल्या बहिणींची काळजी घेताना दिसत आहे.

    या गाण्याला अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला आहे. या गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले असून हिमेश रेशमियाने संगीत दिले आहे. ‘रक्षा बंधन’ चित्रपटाची कथा चार बहिणी आणि एका भावाच्या प्रेमावर आधारित आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षा बंधन’ या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.