shaktiman

आगामी शक्तिमान चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

    आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असलेला शक्तिमान चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. ९० च्या दशकातील प्रेक्षकांची आवडती मालिका शक्तिमान हिला पसंती मिळाली होती. काही दिवसांपूर्वी सोनी पिचर्स यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ‘शक्तिमान’ (Shaktimaan) मालिकेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. त्यातच आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

    १७ वर्षांनंतर हा शक्तिमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने प्रेक्षक पण त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता मालिकेच्या माध्यमातून नाही तर चित्रपटाच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबद्दलची माहिती एका मुलाखतीमध्ये मालिकेमधील शक्तिमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी दिली आहे. मुकेश खन्ना म्हणाले की, ‘खूप वर्षांनी हा प्रोजेक्ट माझ्याकडे आला असून लोक मला शक्तीमान 2 बनवण्यासाठी सांगत असतं. तसेच मला शक्तीमानला पुन्हा टीव्हीवर आणायचे नाही. या चित्रपटासाठी किमान ३०० कोटींचे बजेट असणार आहे.’ असेही ते म्हणाले.

    मुळातच हा चित्रपट एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदिनाथ-स्पृहा (Adinath-Spruha) यांची नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आदिनाथ कोठारे या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसेल. मुलासमोर चांगले उदाहरण ठेवावे म्हणून धडपडणारा बाप आणि त्याच्या प्रयत्नांची पराकाष्टा, बाकीच्यांचा होणारा विरोध हे सर्व या चित्रपटात दाखवले आहे. सामान्यांच्या आयुष्यावर आधारित शक्तिमान चित्रपट आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी सांगून जातो. आदिनाथ-स्पृहा बरोबरच प्रियदर्शन जाधवही चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहे.

    शक्तिमान आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो फक्त त्याला योग्यवेळी स्वतःमध्ये शोधावे लागते,अगदी आपल्या बाबांसारखं! सामन्यातील असामान्यतत्व दाखवणारी, आपल्या आजूबाजूला घडू शकणारी गोष्ट आपल्या घरातली ” शक्तिमान” असे कॅप्शन या ट्रैलेरला देण्यात आलं आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित शक्तिमान चित्रपट २४ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. प्रकाश कुंटे यांनी आजवर हंपी, सायकल, कॉफी आणि बरच काही असे अनेक नामांकित चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत त्यातच आता त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा काय कौल येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.