The suspense is over ... Trupti Desai in the house of Bigg Boss, Dr. Entry of strong contestants including Utkarsh Anand Shinde, Gayatri Datar

  मुंबई : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे बिग ब़ॉस. पहिला आणि दुसरा सीझन प्रचंड गाजल्यानंतर आता मराठी बिग बॉसचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर बिग बॉस चे तिसरे पर्व सुरु झाले. मराठी बिग बॉसच्या ग्रँड प्रमीमिअर सोहळ्यात सस्पेंस संपला आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांची नावे उघड झाली.

  ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली. त्यानंतर हे पर्व संपत नाही तर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरे विजेता ठरला. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले होते. यामुळे तिसऱ्या पर्वाचीही तितकीच उत्सुकता आहे.

  यांना मिळाली बिग बॉसच्या घरात एन्ट्री

  तृप्ती देसाई

  सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या प्रवेशामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत. विशेषत: शनीशिंगणापुर येथील या आंदोलनामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

  डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे

  गायक उत्कर्ष शिंदे हे बिग बॉसच्या घरातील एक स्पर्धक आहेत. ग्रँड प्रमीमिअर सोहळ्यात त्यांनी भाऊ आदर्श शिंदेंसह हजेरी लावली. आदर्श की उत्कर्ष असा संभ्रम प्रेक्षकांना पडला होता. पण शेवटी उत्कर्ष यांना प्रवेश दिला आहे.

  गायत्री दातार

  तुला पाहते रे मालिकेतील गायत्रीची भूमिका चांगलीच गाजली होती.

  सोनाली पाटील

  कोल्हापूरच्या सोनाली पाटीलला टिकटॉकनं ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिनं वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. देवमाणूस या मालिकेत तिने अँडव्होकेट आर्याची भूमिका साकारली होती.

  विशाल निकम

  अभिनेता विशाल निकमची बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री झालीये. साता जन्माच्या गाठी या मालिकेतून विशालला प्रसिद्धी मिळाली होती.

  स्नेहा वाघ

  हिंदी आणि मराठी मालिकेतला प्रसिद्ध चेहरा असलेली स्नेहा वाघ बिग बॉसच्या घरातली स्पर्धक आहे. स्नेहाने अधुरी एक कहाणी, काटा रुते कोणाला या मराठी मालिकांमध्ये काम केलं होतं. तिने ज्योती, वीरा, मेरे साई, चंद्रगुप्त मौर्य या हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

  मीरा जगन्नाथ

  मीरानं मॉडेलिंगमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं माझ्या नवऱ्याचीची बायको या मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील मोमोच्या भूमिकेनं तिला लोकप्रियता मिळवून दिली.

  आविष्कार दारव्हेकर

  मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आविष्कार दारव्हेकरनं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. आविष्कारनं आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात या मालिकांमध्ये काम केलं आहे

  सुरेखा कुडची

  अभिनेत्री आणि नृत्यांगना सुरेखा कुडची यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. सुरेखा यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत बहुचर्चित ‘मीना आत्या’ ही त्यांची भूमिका गाजली होती.