मनोज वाजपेयीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अभिनेत्याचा लुक पाहून चाहते थक्क

आता मनोज वाजपेयीच्या आगानी जोराम नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला मिळालेला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मोठा आहे.

  मनोज वाजपेयीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अभिनेत्याचा लुक पाहून चाहते थक्क

  जोराम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांचा कोणताही नवा चित्रपट किंवा वेब सिरीज आल्यावर त्याला त्यांच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यांचे चाहते त्याच बरोबर बॉलीवूडमधील बऱ्याच त्यांच्या अभिनयाचे कौतुक सुद्धा करतात. याशिवाय त्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी त्याच्या द फॅमिली मॅन या राज डीके सीरिजनं प्रेक्षकांना खूश केले होते. त्याचे आतापर्यत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. आता मनोज वाजपेयीच्या आगानी जोराम नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला मिळालेला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मोठा आहे.

  मनोज वाजपेयी यांच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. देवाशीष मखीजा यांनी दिग्दर्शित केलेला जोराम यापूर्वी जगभरातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला असून त्याचे समीक्षक, परिक्षक आणि प्रेक्षक यांनी खूप कौतुकही केले आहे. या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांची भूमिका केली असून जो आपल्या मुलीला वाचविण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरताना दिसतो. मुलीसाठी तो काहीही करायला तयार होतो. वेळप्रसंगी पोलिसांशी लढाही देतो असे त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

  मखीजा फिल्मस यांच्यावतीनं जी स्टुडिओ द्वारा जोरामची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे आणि मेघा माधूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. यासोबतच तनिष्का चॅटर्जी आणि राजश्री देशपांडे यांच्या भूमिका लक्षवेधी आहेत. हा चित्रपट येत्या आठ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.