‘हर घर तिरंगा’ गाण्यात विराट, हार्दिक आणि राहुलसोबत दिसले ‘हे’ स्टार्स…

या वर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या विशेष प्रसंगी भारत सरकारने 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली आहे. या व्हिडीओमध्ये फिल्मी दुनियेपासून ते क्रिकेटर्स आणि अॅथलीट्सही दिसत आहेत.

    या वर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या विशेष प्रसंगी भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. या विशेष मोहिमेसाठी २४ सेकंदांचे विशेष राष्ट्रगीत (हर घर तिरंगा गीत) तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत दिसत आहेत. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या देखील या गाण्यात दिसत आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठीच ‘हर घर तिरंगा’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये फिल्मी दुनियेपासून ते क्रिकेटर्स आणि अॅथलीट्सही दिसत आहेत.

    २४ सेकंदांचा हा व्हिडिओ सोनू निगम, आशा भोसले यांनी गायला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास देखील दिसत आहेत. त्याचवेळी पीव्ही सिंधू, मीराबाई चानू ते नीरज चोप्रा आणि कपिल देव हे देखील या व्हिडिओचा एक भाग आहेत. हे सर्व लोक जनतेला आवाहन करत आहेत की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी प्रत्येक घरात तिरंगा लावा.