‘केबीसी ज्युनियर’मध्ये एक कोटी रुपये जिंकणारा हा १४ वर्षांचा मुलगा झाला IPS अधिकारी, १५ प्रश्नांची दिली अचूक उत्तरे

लोकप्रिय टेलिव्हिजन शो 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या नव्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच वेळी, लवकरच या शोचा नवीन सीझन सोनी टीव्हीवर ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

    प्रेक्षकांना लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘कौन बनेगा करोडपती’ पाहायला आवडतो. या शोच्या नव्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच वेळी, लवकरच या शोचा नवीन सीझन सोनी टीव्हीवर ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या शोमधून प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच खूप काही शिकायला मिळते. त्याचबरोबर या शोच्या अनेक स्पर्धकांचे नशीबही बदलले आहे.

    आता या शोची एक बातमी चर्चेत आहे. वास्तविक, २००१ साली ‘केबीसी ज्युनियर’ या शोमध्ये केवळ १४ वर्षांच्या मुलाने भाग घेतला होता. होस्ट अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवर बसून विचारलेल्या १५ प्रश्नांची उत्तरे देऊन १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले होते. त्याच्या बुद्धीने लोकांना आश्चर्यचकित केले होते. आम्ही बोलत आहोत आजचे आयपीएस अधिकारी रवी मोहन सैनी यांच्याबद्दल.

    जो वयाच्या १४व्या वर्षी सुपरहिरोला भेटण्याचे स्वप्न घेऊन या शोमध्ये स्पर्धक म्हणून पोहोचला होता आणि तो विजयाचे नाव घेऊन शोमधून बाहेर पडला. रवी सैनी हा अभ्यासात खूप वेगवान होता आणि त्याने UPSC ची तयारी करून परीक्षा पास केली आणि आता IPS अधिकारी म्हणून देशाची सेवा करत आहे. एवढेच नाही तर रवी सैनीने एमबीबीएसचे शिक्षणही पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’चा १४वा सीझन ७ ऑगस्टपासून प्रसारित होणार आहे. पुन्हा एकदा अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणार आहेत.