‘हे’ आहे आलिया आणि रणबीरच्या मुलीचं नाव! असा आहे त्या नावाचा अर्थ

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी काहीच दिवसांपूर्वी चिमुकलीचा आगमन झालं आहे. बाळाच्या जन्मापासूनच चाहत्यांमध्ये आलिया रणबीर त्यांच्या गोंडस परीच काय नाव ठेवतात याबाबत उत्सुक होते. अखेर आलियाने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो पोस्ट करत आपल्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. आलिया रणबीरने आपल्या मुलीचे नाव ‘राहा’ (Raha) असे ठेवले आहे. विशेष म्हणजे बाळाचे नाव हे आजी नीतू कपूर यांनी ठेवल्याचे देखील आलियाने सांगितले.

    इंस्टाग्रामवर आलियाने एक छान फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत आलिया आणि रणबीर त्यांच्या मुलीसोबत दिसत आहेत. तर या फोटो मध्ये दिसत असलेल्या भिंतीवर एका लहान मुलाच्या फुटबॉलच्या जर्सीवर ‘Raha’ असे लिहिले आहे. आलियाने मुलीच्या नावाची घोषणा करीत असताना त्याचा अर्थ देखील सांगितला आहे. आलिया भट्टने लिहिले की, “आमच्या मुलीचे राहा हे नाव तिच्या आजीने निवडले आहे, या नावाचा इतका सुंदर अर्थ आहे. राहा म्हणजे एक दैवी मार्ग, स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद, संस्कृतमध्ये याचा अर्थ गोत्र… बंगालीमध्ये याचा अर्थ विश्रांती, अरबी भाषेत याचा अर्थ शांती, आनंद, स्वातंत्र्य.” अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये आलियाने राहा नावाचा अर्थ सांगितला आहे.