या ‘Valentine’s Week’ ला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत बघा तुमचे आवडते चित्रपट, सुरू झालीये जुन्या रोमँटीक चित्रपटांची मेजवानी!

प्रेमाच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांचे आवडते चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहता येणार आहेत.

    ‘Valentine’s Week’ म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे. आज चॅाकलेट डे () आहे. आज जोडपं आपआपल्या पार्टनरला चॅाकलेट गिफ्ट करुन आपल्या भावना व्यक्त करतात. पण हा आंनद आता द्विगुणित करता येणार आहे आपले आवडते रोमॅन्टिक चित्रपट आपल्या पार्टनर सोबत पाहून. होय, व्हॅलेंटाईन वीक निमित्त तुम्हाला तुमचे जुने रोमॅन्टिक चित्रपट तुमच्या पार्टरनसोबत पाहत येणार आहे.  व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) निमित्ताने बॉलीवूडमधील गाजलेले जुने रोमँटीक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आजपासून म्हणजेच 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत हा फिल्मफेस्टिवल आयोजीत करण्यात आला आहे.  PVR, INOX, CINEPOLIS या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पाहता येतील.

    कुठे पाहत येईल चित्रपट

    Valentine’s Week निमित्त हे चित्रपट पाहत येणार आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, गोवा, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, कोची, लखनऊ, जयपुर, इंदौर या शहरातील प्रेक्षकांनाच या फिल्म फेस्टिवलचा लाभ घेता येणार आहे . या चित्रपटांचा तिकीट दर हा 112 रुपयांपासून सुरु होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदीशिवाय पंजाबी,तामिळ, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमधले गाजलेले चित्रपट तुम्ही पाहू शकता.

    ‘हे’ चित्रपट पाहता येणार

    या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘टायटॅनिक’, ‘जब वी मेट’, ‘प्यार का पंचनामा’, ‘मोहब्बते’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘वीर-झारा’, ‘सीता रामम’, ‘प्रेमम’, ‘विन्नैथांडी वरुवाया’, ‘सप्त सागरदाचे एलो – साइड ए एंड साइड’ आणि ‘दिल दिया गल्ला’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटांसोबत एकूण 26 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील.