कॉमेडियन राजू श्रीवास्तवला धमकीचा फोन, दुसऱ्यांदा घडला धक्कादायक प्रकार…

कॉमेडियन राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) दुसऱ्यांदा एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन (call) आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तवला (Raju Srivastava) दुसऱ्यांदा एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या व्यक्तीने राजूला जीवे मारण्याची धमकी दिली असून राजूच्या मुलांना देखील मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणानंतर कानपूर पोलीस ठाण्यात (Kanpur Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तवला व्हॉट्सअॅप कॉलवर हा धमकीचा फोन आला आहे. यात त्याच्या मुलांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोबतच लखनौच्या कमलेश तिवारीसारखी परिस्थिती करु असंही, या अज्ञात इसमाने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी कॉमेडियनने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. तसेच हा धमकीचा फोन पाकिस्तानमधील कराची येथून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वीदेखील राजूला असाच धमकीचा फोन आला होता. त्यावेळीदेखील त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु आता पुन्हा एकदा दुसरा प्रकार राजूसोबत घडला आहे.