
‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye) या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा गरोदर दाखवण्यात आली आहे.रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळं तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळं तिचं डोहाळे जेवण(Baby shower Program In Ti Parat Aaliye Serial) करण्याचं सर्वजण ठरवतात.
झी मराठीवर(Zee Marathi) सुरू असलेली ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye)ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेनं अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. त्यामुळं या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा गरोदर दाखवण्यात आली आहे.रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळं तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळं तिचं डोहाळे जेवण(Baby shower Program In Ti Parat Aaliye Serial) करण्याचं सर्वजण ठरवतात.
View this post on Instagram
डोहाळे जेवण हा कार्यक्रम लोकप्रिय मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’मधील ‘कोणी तरी येणार येणार गं…’या गाण्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळं मालिकेतही वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी अगदी उत्साहात रोहिणीच्या डोहाळे जेवणाचा बेत आखण्यात आला आहे. त्यात हे गाणं देखील असणार आहे.
या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि टिक्या म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे थिरकताना दिसतील. या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान सर्व कलाकारांनी धमाल केली आणि या गाण्याच्या शूटींगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सना देखील सर्व कलाकारांची शूटिंग दरम्यान चालली मजा मस्ती पाहून धमाल येतेय.