
'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत भारतात 229.65 कोटींची कमाई केली आहे.
अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Imran Hashmi) यांची मुख्य भुमिका असलेल्या टायगर 3 (Tiger 3) दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रेक्षक आणि समिक्षांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी 44 कोटींची कमाई केली तर, चित्रपटाच्या कमाईचा हा आलेख दिवसेंदिवस वाढत जाताना रविवारी मात्र, टायगर 3 ला फार कमाई करता आली नाही. (Tiger 3 box office collection day 8) किती कमाई केली जाणून घ्या. याचं कारण म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामना (IND vs Aus) असल्याने वीकेंड असूनही ‘टायगर 3
‘ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. पहिल्या दिवशी ‘टायगर 3’ने 44.5 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 59.25 कोटी कमावले विक डेजमध्ये चांगली कमाई करण्याऱ्या टायगरला या रविवारी म्हणजे चित्रपटाच्या 8 व्या दिवशी मोठा फटका बसला. आठव्या दिवशी वीकेंडला या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली. ‘टायगर 3’ या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत भारतात 229.65 कोटींची कमाई केली आहे.
टायगर 3 ने आतापर्यंत किती कमाई केली?
पहिला दिवस : 44.5 कोटी
दुसरा दिवस : 59.25 कोटी
तिसरा दिवस : 44.3 कोटी
चौथा दिवस : 21.1 कोटी
पाचवा दिवस : 18.5 कोटी
सहावा दिवस : 13.25 कोटी
सातवा दिवस : 18.5 कोटी
आठवा दिवस : 10.25 कोटी
एकूण कमाई : 229.65 कोटी
कतरिनाने प्रेक्षकांचे मानले आभार
चित्रपटाला चांगला प्रतिसाद पाहून कतरिनाने काही दिवसापुर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहत, हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले. कतरिना म्हणाली, धन्यवाद आणि चित्रपटगृहात टायगर 3 पहा.